Ad will apear here
Next
बीएनपी पारिबास डायनॅमिक इक्विटी फंड विक्रीसाठी खुला
पुणे : बीएनपी पारिबास म्युच्युअल फंडाने बीएनपी पारिबास डायनॅमिक इक्विटी फंड बाजारात आणला असून, हा एनएफओ २८ फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूकीसाठी खुला आहे. या योजनेअंतर्गत इक्विटी, कॅश फ्युचर/ आर्बिट्राज, मनी मार्केट आणि डेट फंडामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. 

कार्तिकराज लक्ष्मणन आणि अभिजित डे इक्विटी फंडाचे व्यवस्थापन करणार आहेत, तर मयांक प्रकाश डेट फंडातील गुंतवणूक सांभाळणार आहेत. या फंडासाठीची किमान गुंतवणूक रक्कम पाच हजार रुपये आहे. या फंडसाठी एन्ट्री लोड लागू असणार नाही; मात्र  १२ महिन्यांच्या आत या योजनेतून गुंतवणूकदारांनी दहा टक्क्यांपेक्षा जास्त पैसे काढून घेतले तर एक टक्का एक्झिट लागणार आहे. १२ महिन्यानंतर गुंतवणूक काढल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.  

बीएनपी पारिबास म्युच्युअल फंडाचे रिसर्च विभागाचे प्रमुख चोकलिंगम नारायणन्या फंडाबाबत अधिक माहिती देताना बीएनपी पारिबास म्युच्युअल फंडाचे रिसर्च विभागाचे प्रमुख चोकलिंगम नारायणन् म्हणाले, ‘या फंडासाठी इक्विटी आणि आर्बिट्राजमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात येणार आहे. सध्या गुंतवणुकीसाठी वातावरण चांगले आहे. क्रूड ऑईलचे दर, चीन आणि अमेरिकेतील व्यापारयुद्ध, अमेरिकेतील फेडरल बँकेचा व्याजदराबाबतचा निर्णय आणि आपल्या देशातील येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका या या सर्व घडामोडी शेअर बाजारातील चढ-उतारासाठी महत्त्वाच्या ठरतील. त्यानुसार म्युच्युअल फंडाच्या कामगिरीवर परिणाम होईल. येणाऱ्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत या घडामोडी महत्त्वाच्या ठरतील, तर नंतरच्या सहा महिन्यात महागाई, चलनवाढ, सरकारी धोरणे, निर्णय आदी बाबी महत्त्वाच्या ठरतील. अलीकडच्या काळात मागणी वाढत असल्याने गुंतवणूक वाढत आहे. रस्ते, रेल्वे, मेट्रो आदी पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढत आहे. त्याचा अनुकूल परिणाम दिसेल. त्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.’

डायनॅमिक इक्विटी फंड बाजारमूल्य वाढले की इक्विटीमध्ये कमी प्रमाणात गुंतवतात. याउलट बाजारमूल्य घसरले की इक्विटीतील गुंतवणूक वाढवतात. यातील इक्विटीचे प्रमाण हे मोजणीच्या पद्धतीनुसार बदलते. प्रत्येक फंड गुंतवणुकीची वेगवेगळी पद्धत वापरतो. ही पद्धत एकतर निफ्टी पीईवर आधारित असते किंवा मत्तावाटपाच्या स्वतःच्या पद्धतीवर आधारित असते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZPYBX
Similar Posts
एसडब्ल्यूपी म्हणजे काय? मागील लेखात आपण म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या एसआयपी या पर्यायाबाबत माहिती घेतली. असाच आणखी एक पर्याय आहे ‘एसडब्ल्यूपी.’ ‘समृद्धीची वाट’ या सदरात आज त्याची माहिती घेऊ या...
....असे करा आर्थिक नियोजन योग्य वेळी योग्य पद्धतीने आर्थिक गुंतवणूक केल्यास आपली उद्दिष्टे सहज साध्य होऊ शकतात. त्यासाठी आपल्या उत्पन्नाच्या आधारावर कशी, कुठे गुंतवणूक करावी याची सविस्तर माहिती आजच्या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ...
तुम्हाला ‘एसआयपी’बद्दल माहिती आहे? शेअर बाजाराची फारशी माहिती नसतानाही तुलनेने कमी जोखीम घेऊन बँकेतील गुंतवणुकीपेक्षा जास्त फायदा मिळवायचा असेल, तर त्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ‘समृद्धीची वाट’ या सदरात आज पाहू या ‘एसआयपी’बद्दल...
म्युच्युअल फंड – गुंतवणुकीचा किफायतशीर पर्याय म्युच्युअल फंडांची चर्चा अलीकडे सर्रास आपल्या कानावर पडते. त्यातील गुंतवणूक वाढली असल्याचे अहवालही आपल्याला वाचायला मिळतात मात्र सर्वसामान्य गुंतवणूकदारांना या पर्यायाबद्दल सहज समजेल अशी माहिती मिळत नसल्याने त्यांचे याकडे वळण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. म्हणूनच ‘समृद्धीची वाट’ या सदरात आपण म्युच्युअल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language